जळगावात विठ्ठल नामाच्या गजारात पालखी सोहळा उत्साहात

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री क्षत्रिय शिंपी समाज संचलित युवक महिला मंडळ व संयोगी शाखेंच्या वतीने २ ऑगस्ट रोजी वारकरी संप्रदायाचे आद्य प्रचारक संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७४ व्या संजीवन समाधी पालखी सोहळा मोठ्या भावभक्तीने आयोजित करण्यात आला होता. शिंपी समाजाच्या श्रीमती मनोराबाई जगताप कला सांस्कृतिक सभागृह येथील संत नामदेव महाराजांच्या मंदिराचे येथून भव्य पालखी सोहळ्याला सुरुवात झाली.

पालखी ही पांझरापोळ टॉकी, मारुती पेठ, सुभाष चौक,श्री गुरुद्वारा साहेब कमिटीच्या वतीने पालखी वरती पुष्प वृष्टी करून पालखीचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे यांनी गुरुद्वारा साहेब येथे जाऊन प्रसाद व गुरुनानक देवजी यांनी यांच्या चरणी नतमस्तक केले. यानंतर पालखीचा समारोप दुपारी १२:३० सरदार वल्लभभाई भवन येथे समारोप करण्यात आला. याप्रसंगी समाज अध्यक्ष यांनी समाज माऊलीचे आभार व्यक्त केले. असाच आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी राहवे असे या प्रसंगी सांगितले.

माजी महापौर सीमा भोळे, जयश्री महाजन, माजी उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, युवा नेते पियुष कोल्हे, अॅड. सुभाष चव्हाण यांची विशेष उपस्थिती होती. यानंतर समाजामध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या व नुकत्याच विविध पदावर निवड झालेल्या सागर शिंपी, अमित सोनवणे, हितेष पवार, राजेंद्र खैरनार, संजय निकुंभ, कुणाल चव्हाण याचा सत्कार करण्यात. पालखी सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे महिला भगिनींनी एक ताल, एक स्वरात टाळ मृदुंगाच्या गजरात, भजन व सुंदर नृत्य सादर केले. व फुगड्या खेळून पालखी सोहळ्याचा आनंद उत्सव केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे पदाधिकारी कार्यकर्ते युवक मंडळ महिला मंडळ सर्व शाखा अध्यक्ष व कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम केले.

Protected Content