Home क्राईम जळगावात तरूणाच्या हातातील मोबाईल चोरट्यांनी लांबविला

जळगावात तरूणाच्या हातातील मोबाईल चोरट्यांनी लांबविला


जळगाव प्रतिनिधी । शहरातील घाणेकर चौकातून पायी जाणाऱ्या तरूणाच्या हातातून दुचाकीवरून येणाऱ्या अज्ञात दोन जणांनी हातातील मोबाईल हिसकावून पसार झाल्याची घटना घडली. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की गिरीश समाधान माळी (वय-२२) रा. कांचन नगर, जळगाव हा तरूण सोमवारी १३ डिसेंबर रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास मोबाईलवर बोलत पायी जात असतांना त्याच्या मागून अज्ञात दोन चोरटे दुचाकीवर आले. चोरट्यांनी तरूणाच्या हातातील मोबाईल जबरी हिसकावून दुचाकीवर पसार झाले. तरूणाने आरडाओरड केली तोपर्यंत चोरटे दुचाकीवर बसून पसार झाले होते.

याप्रकरणी गिरीश माळी या तरूणाने गुरूवार १६ डिसेंबर रोजी शनीपेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात दोन जणांविरोधात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून शनीपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि यशोदा कणसे करीत आहे.

 


Protected Content

Play sound