जळगाव प्रतिनिधी । शहरातील गुजराल पेट्रोलपंप परिसरातील शिवराणा नगरात पुण्याला गेलेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी रोकड, टीव्ही, मोबाईलसह ३६ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रविवार, २२ जानेवारी रोजी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, उमंग सिमंग भगवानसिंग पाटील (वय ६१) हे पत्नी , मुलगा व सुन या परिवारासह वास्तव्यास आहेत. १५ जानेवारी रोजी कुटुंबासह उमंग पाटील हे खाजगी कामानिमित्ताने पुण्याला गेले होते. २० जानेवारी रोजी ते पुण्यावरुन घरी परतले. यावेळी त्यांना घराला लावलेल कुलूप दिसले नाही. तसेच घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेला दिसला. घरात पाहणी केली असता चोरी झाल्याची खात्री झाली. चोरट्यांनी उमंग पाटील यांच्या घरातून १० हजारांचा एलईडी टीव्ही, २० हजाररुपये रोख, फोन, ब्लुटूथ स्पीकर, ट्रॅव्हलिंग बॅग असे ६ हजारांचे साहित्य असा एकूण ३६ हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याचे समोर आले. याप्रकरणी उमंग पाटील यांनी रविवारी रामानंदनगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरुन रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.