हिंगोणे येथे शेतकऱ्याचे बंद घर फोडून ५५ हजारांचा ऐवज लांबविला

चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणे गावात शेतकऱ्याचे बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना रविवार १२ मे रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सोमवारी १३ मे रोजी रात्री १० वाजता चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, ज्ञानेश्वर एकनाथ बोरसे वय-५७, रा. हिंगोणे ता. चाळीसगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत असतात. दरम्यान त्यांचे घर ६ मे ते १२ मे दरम्यान बंद होते. त्यामुळे घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे व दागिने आणि रोख रक्कम असा एकूण ५५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना उघडकीला आल्यानंतर सोमवारी १३ मे रोजी रात्री १० वाजता ज्ञानेश्वर बोरसे यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय शिंदे हे करीत आहे.

Protected Content