जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । गायत्रीनगर येथील रहिवाशांनी स्टेट बँकेकडून सात लाखांचे कर्ज घेतले आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी बँकेचे हप्ते न भरल्याची चौकशी केली असता, त्याने सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचे आढळून आल्यानंतर गुरुवारी, 30 जून रोजी दुपारी जिल्हा पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत माहिती अशी की, शहरातील गायत्रीनगरात राहणारा पवन अमरनाथ मिश्रा याने बनावट दस्तऐवज खरे असल्याचे भासवून स्टेट बँकेच्या मुख्य शाखेत कर्ज प्रकरण टाकले होते. बँकेने सर्व दस्तऐवज कागदपत्रांची पळताळणी करुन मिश्रा याला ७ लाखांचे कर्ज मंजुर करुन ते ३ फेब्रुवारी २०२२ रोजी अदा केले. बँकेकडून कर्जप्राप्ती झाल्यानंतर कर्जाच्या हप्त्याच्या तारखा सुरु झाल्या, मात्र कर्जाचे हप्तेच भरले जात नसल्याने बँकेतून संबधीत ग्राहकाला संपर्क करण्यात आला. तर, मोबाईल बंद असल्यामुळे घर गाठून चौकशी केली तर घर सुध्दा बंद होते. अखेर त्याची माहिती घेतली असता तो अनेक दिवसांपासून घरीच आलेला नसल्याचे शेजारच्यांनी सांगताच बँक अधिका-यांनी याबाबत वरीष्ठांना कळवले. गुरूवारी बँक मॅनेजर सिसीर पटकनायक यांनी जिल्हापेठ पोलिसात तक्रार दिल्यावरुन पवन अमरनाथ मिश्रा याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पेालिस निरीक्षक राजेंद्र पवार करत आहेत.