धरणगावात मुख्याध्यापकांचे बंद घर फोडले; रोकडसह दागिन्यांची चोरी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरातील स्वामी समर्थ नगर परिसरात एका मोठ्या चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. आनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एच. चौधरी यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून सोन्याचांदीचे दागिन्यांसह रोकड असा एकुण १ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील स्वामी समर्थ नगरात अनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एच.चौधरी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. चौधरी हे पुण्यातील नातीचा वाढदिवसानिमित्त ३ फेब्रुवारी रोजी पासून बाहेरगावी गेले होते. त्यामुळे त्यांचे घर बंद होते. या संधीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी गुरूवारी ६ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री चौधरी यांचे बंद घराचा दरवाजाचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून घरातील कपाटातून २२ हजारांची रोकड, सोन्याचांदीचे दागिने असा एकुण १ लाख ७२ हजारांचा ऐवज चोरून नेली. ही घटना सकाळी ७ वाजता उघडकीला आली. या घरफोडी झाल्याचे लक्षात आल्यानंतर धरणगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. श्वानपथकाची मदत घेत तपासाला सुरूवात केली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content