दहिगावमध्ये डॉ. आंबेडकर जयंतीच्या फलकाची विटंबना : गावात तणावपूर्ण शांतता

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील दहिगाव येथील मुख्य चौकात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लावण्यात आलेल्या शुभेच्छा फलकाची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार घडला असून यामुळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्मित झाले आहे.

तालुक्यातील दहिगाव येथील गावातील मुख्य चौकातील महापुरुषांच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताच्या शुभेच्छा फलकाची विटंबना केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले होते. घटनेची खबर मिळताच फैजपूर उपविभागीय पोलीस अधिक उपाधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर हे पोलीस ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर गावातील वातावरण तणावपूर्ण शांत असून सर्व शेतीचे व्यवहार सुरळीत सुरू आहेत. पोलीस बंदोबस्त तैनात असून उपअधीक्षक डॉ कुणाल सोनवणे राकेश मानगावकर ,पोलीस अधिकारी व ताफ्यासह तळ ठोकून आहेत

रविवारी सकाळी घटनेचे वृत्त गावात कळताच, मोठ्या संख्येने जमाव मुख्य चौकात जमून सुमारे तीन तास पोलीस चौकी समोर ठिय्या आंदोलन दिले पोलीस उपअधीक्षक डॉक्टर कुणाल सोनवणे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी प्रशासनाच्या वतीने थोर पुरुषाच्या प्रतिमेचे शुद्धीकरण केले.

या प्रसंगी सरपंच अजय अडकमोल, कोरपावली सरपंच विलास अडकमोल यांचे सह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गावात सध्या तणावपूर्ण शांतता असून चोपडा आणि विविध ठिकाणावर दंगा नियंत्रण पथकासह स्थानिक पोलीस अधिकारी पोलिस उपनिरिक्षक अविनाश दहिफळे, पोलीस उपनिरिक्षक सुनील मोरे, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर यांचे सह पोलीसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान महापुरुष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या शुभेच्छा फलक विटंबना प्रकरणी पोलिसांनी पाच संशयीतांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांनी पत्रकारांना दिली. दहिगाव गावात विटंबनानंतर तणावपूर्ण वातावरण असल्याने यावल ते दहिगाव सावखेडा बस सेवा सकाळ पासून बंद करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वीच यावल तालुक्यातील अट्रावल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. यानंतर दहिगाव येथे फलकाची विटंबना करण्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान, कडेकोटे पोलीस बंदोबस्त असल्याने दहिगावात कुठलाही अनुचीत प्रकार घडला नाही.

Protected Content