चोपडा प्रतिनिधी । येथे नाभीक समाजातर्फे समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नगरपालिकेच्या श्रीमती शरदचंद्रिका पाटिल सभागृहात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी पिंपळनेर तालुक्यातील सामोडा येथील महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातर्फे उत्तीर्ण होवून आयकर विभागात रुजू होणाऱ्या कु. धनश्री सैंदाणे यांच्यासह तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला आहे. याचबरोबर समाजातील जेष्ठ नागरिकांच्याही सन्मान करण्यात आला.
यावेळी कु. धनश्री सैंदाणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, घरची परिस्थिती साधारण असतांना देखील माझ्या आईवडील यांनी माझ्या शिक्षणाला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी आज या पदावर जाऊ शकली, घरची परिस्थिती गरीबीची असली तरी मनात ध्येय असल्यास आपण कोणतेही उद्दिष्ट साध्य करू शकतो. असे धनश्री यांनी यावेळी सांगितले. तसेच तालुका अध्यक्ष रवींद्र सैंदाणे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, समाजाच्या प्रत्येक विद्यार्थींनी शिक्षणाकडे लक्ष द्यायला हवे, कारण शिक्षणाशिवाय भविष्यात पर्याय नाही, आज कु.धनश्री सेंदाने व समाजातील गुणवंत विद्यार्थी यांच्या सत्कार करताना खरोखर आनंद होत असल्याचं त्यांनी उपस्थितीतांना सांगितले.
यावेळी कु.धनश्री सैंदाणे यांचे वडील नागेश सैंदाणे व आई कोकिळा सैंदाणे, सोपान बाविस्कर, सुभाष सेंदाने, नंदलाल वाघ, तालुका अध्यक्ष रवींद्र सैंदाणे, तालुका उपाध्यक्ष न्यानेश्वर सोनवणे, राजेंद्र निकम, राजू येशी, दत्ता सेंदाने, अनील पवार, हिरालाल सोनवणे, विनोद निकम, डॉ.ललित सैंदाणे, सुभाष सेंदाने, आधार वसाने, शहर अध्यक्ष मनोहर सोनगिरे, उमाकांत निकम, बापु पवार, दिनेश जगताप, देवीदास बाविस्कर, किरण शिरसाठ, यांचासह सर्व समाज बांधवांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय जाधव तर आभार प्रदर्शन तालुका अध्यक्ष रवींद्र सैंदाणे यांनी केले.