राजनंदगाव (वृत्तसंस्था) येथील बगनादी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीतागोटा जंगल परिसरात नक्षलवादी आणि जिल्हा राखीव दलाच्या जवानांमध्ये आज सकाळी चकमक झाली. यावेळी जवानांनी सात नक्षलवाद्यांना ठार केले आहे.
नक्षलवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. अद्याप चकमक सुरू असल्याचे वृत्त आहे. यापूर्वी, २९ जुलै रोजी सुकमा जिल्ह्यातील कोंटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात जिल्हा राखीव दलाने कारवाई करून दोन नक्षलवाद्यांचा खात्मा केला होता. त्यात एका महिलेचाही समावेश होता.