अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मोठी घोषणा केली.प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे नेते संदिपान भुमरे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
आम्ही महायुतीसोबत नाही, केवळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे, एकनाथ शिंदे यांचे आमच्यावर ऋण आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहेत. असे माध्यमांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले.
छत्रपती संभाजीनगरात महायुतीच्या उमेदवाराला बच्चू कडू यांनी दिला जाहीर पाठिंबा
8 months ago
No Comments