दाभोलकर हत्या प्रकरणी तिघांची निर्दाष सुटका; दोन जणांना जन्मठेपेची शिक्षा

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तब्बल ११ वर्षांनंतर डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्याप्रकरणातील निकाल आज १० मे रोजी जाहीर झाला आहे. अंधश्रध्दा निर्मूल समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने निकाल जाहीर केला आहे.
पुणे येथील सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. न्यायालयाने पाचपैकी तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली असून सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. निर्दोष सुटका करण्यात आलेल्यांमध्ये डॉ. वीरेंद्र तावडे, विक्रम भावे, संजीव पुनाळेकर यांचा समावेश आहे.

२० ऑगस्ट २०१३ मध्ये पुण्यातील भरवस्तीत सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली होती. मात्र, या हत्येचा मुख्य सूत्रधार कोण? हे अजूनही समोर आलेले नाही अशी प्रतिक्रिया निकालानंतर हमीद दाभोलकर यांनी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतरच कॉ. गोविंद पानसरे, डॉ. कलबुर्गी, गौरी लंकेश या पुरोगामी विचारवंताचीदेखील हत्या करण्यात आली. या चारही हत्येतील आरोपींचा परस्परसंबंध असल्याची चर्चा सुरू आहे.

सुरुवातीला महाराष्ट्र पोलिस त्यानंतर सीबीआयकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला. सीबीआयने दाभोळकर हत्येप्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अ‌ॅड. सचिन पुनोळकर आणि विक्रम भावे या पाच आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात सप्टेंबर २०२१ मध्ये खटला सुरू झाला. म्हणजेच हत्येच्या ८ वर्षांनंतर आरोपींविरोधात खटला सुरू झाला. आता निकाल आला आहे. दिरंगाईमुळे राज्यभरात अंनिसतर्फे ठिकठिकाणी काळ्या फित लावून निषेध करण्यात आला. यासोबतच ठिकठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन ३ प्रमुख मागण्या करण्यात आल्या.

Protected Content