जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आव्हाने शिवारातील चंदू अण्णानगर मध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात यावी या मागण्यासाठी स्थानिक रहिवासी यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना सोमवारी २९ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जळगाव शहरातील हवा आणि शिवारातील चंदू अण्णा नगरात ३५ ते ४० कुटुंब हे कायमस्वरूपी रहिवासी आहे. १९९९ ते आज पर्यंत महानगरपालिके अंतर्गत रस्ते, गटारी, विजेचे सुविधा अजूनही उपलब्ध झालेले नाही. दरम्यान विजेचे दिवे नसल्या कारणामुळे या परिसरात सरपटणारे प्राणी फिरतात, या संदर्भात संबंधितांना लेखी निवेदन देण्यात आले आहे. अद्यापपर्यंत या सुविधा उपलब्ध झालेल्या नाहीत. याच परिसरातील शेजारील भागात रस्ते हे सिमेंटचे झालेले आहेत. शिवाय रस्त्यावरील पथदिवे देखील लावण्यात आलेले आहे.
चंदूअण्णा नगरातील काही भागात रहिवासी हे मोल मजुरी करून आपला उदरनिर्वाह करत असतात, दरम्यान पावसाळ्यात आणि इतर वेळी गटारी आणि रस्ता नसल्या कारणामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर चिखल आणि डबके साचते व त्यामुळे डासांचा उपद्रव वाढलेला आहे. दरम्यान महानगरपालिका प्रशासनाने या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी करून लवकरात लवकर वीजपुरवठा रस्ता आणि गटाऱ्यांचे कामे पूर्ण करावी, अशी मागणीचे निवेदन महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांना दिले आहे. या निवेदनावर स्थानिक रहिवासी वंदना खैरनार, संजय खैरनार, प्रतिभा पाटील, सोनाली पाटील, प्रकाश चौधरी, संध्या पाटील, विद्या चौधरी, संभाजी पाटील, वर्षा पाटील, भरत मस्के, सुरेखा मस्के, विक्रांत मस्के, शांताराम पाटील, विजय मस्के, वंदना मस्के, यांच्यासह स्थानिक रहिवाशांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.