चाळीसगावात ६० हजाराची लाच घेतांना कंत्राटी डॉक्टरला अटक

चाळीसगाव प्रतिनिधी  । चाळीसगाव रूग्णालयात कोरोना काळात भाडेतत्वावर लावेलेल्या रूग्णवाहिकेच्या बिलांची पडताळणी करून लागणारे पत्राच्या मोबादल्यात ६० हजाराची लाच घेणाऱ्या कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्याला रंगेहात पकडले आहे.

 

याबाबत माहिती अशी की, तक्रारदार हे चाळीसगाव शहरातील रहिवाशी आहेत. तक्रारदार यांच्या दोन रूग्णवाहिका आहे. कोरोना काळात चाळीसगाव ट्रामा सेंटर ते चाळीसगाव तालुक्यात ने-आण करण्यासाठी भाडेतत्वावर लावले होते. रूग्णवाहिकेच्या बिलाची पडताळणी करून वैद्यकीय अधिक्षकांसह सही व शिक्क्याच्या मोबदल्यात कंत्राटी डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद (वय-३८) रा. चौधरीवाडा चाळीसगाव याने ६० हजाराची लाचेची मागणी केली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज दुपारी सापळा रचून संशयित आरोपी डॉक्टर मुश्ताक मोतेबार सैय्यद याला पैसे घेतांना रंगेहात पकडला. पुढील कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

Protected Content