चाळीगावात एकाच्या डोक्यात टाकला लोखंडी रॉड

चाळीसगाव प्रतिनिधी । जुन्या वादावरुन एकाच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकल्याची घटना शहरातील नागद रोडवर घडली असून याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील नागद रोडवरील फैजान शेख मज्जीत याला जुन्या वादाच्या कारण उकरून लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण करून जबर दुखापत झाल्याची घटना शुक्रवार रोजी दुपारी १:४५ वाजताच्या सुमारास साई कृष्णा हॉटेलसमोर घडली आहे. मोया समीर शेख, समीर शेख व नयुर शेख या तिघांकडून फैजान शेख मज्जीत याला मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात फैजान शेख मज्जीत यांच्या फिर्यादीवरून भादवी कलम-३०७ प्रमाणे वरील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि दिपक बिरारी हे करीत आहेत.

 

Protected Content