कळमसरे येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरे, पाडळसरे, गोवर्धन आदी ठिकाणी नुकताच जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला.

यात सकाळी पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने फराळाचे वाटप केले.कार्यक्रम ची सुरवात मारवड पोलीस ठाण्याचे API राहुल फुला यांच्या हस्ते वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करीत करण्यात आले.यावेळी उपसरपंच जितेंद्र पाटील ,राजपुत्र एकलव्य सेनेचे अध्यक्ष किशोर मालाचे व सन्माननीय सदस्य उपस्थित होते. तर,दुसरीकडे पाडळसरे याठिकाणी देखील वीर एकलव्यचे आदिवासी बांधवांकडून प्रतिमा पूजन करण्यात आले. गोवर्धन येथील काळभैरव मंदिरात जीप शाळेतील,सुमारे 62 आदिवासी मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

दरम्यान कळमसरेत महादेव पुरापासून सम्पूर्ण गावात DJ च्या तालावर वाजत-गाजत शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रत असंख्य समाजबांधव महिला तरुण तरुणी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी अनेकांनी आदिवासी गीतांवर ठेका धरत नाचण्याचा मनमुराद आनंद लुटला.

 

Protected Content