भुसावळात प्रभाग क्र.४ ‘अ’ची पोटनिवडणूक होणार बिनविरोध

bhusaval potnivadanuk

भुसावळ प्रतिनिधी । येथील प्रभाग क्रमांक ४ ‘अ’ चे नगरसेवक रवींद्र खरात यांच्या दुर्दैवी मृत्यूमुळे रिक्त झालेल्या जागेसाठी त्यांचे चिरंजीव राजकुमार खरात यांना या पोटनिवडणुकीत बिनविरोध निवडून आणण्याचा संकल्प माजी नगरसेवक तथा रिपाईचे जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली व सर्वपक्षीय मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे.

या बैठकीत माजी नगरसेवक जगन सोनवणे, रमेश मकासरे, माजी उपनगराध्यक्ष रवींद्र निकम, गटनेते उल्हास पगारे, लक्ष्मण जाधव, नगरसेवक रवी सपकाळे, शरद सोनवणे, विश्वास खरात, पप्पू सुरडकर, योगेश तायडे, गिरीष तायडे, बाळा मोरे, सरजू तायडे, गोरखनाथ सुरवाडे, संगीता खरे, उमेश चाबुकस्वार, बाळा पवार, योगेश तायडे, विलास खरात, शरद जोहरे, छोटेलाल हरणे, अब्दुल हमीद कुरेशी, अशोक भालेराव आदी उपस्थित होते.

Protected Content