वरणगाव ता. भुसावळ दत्तात्रय गुरव । गेल्या दोन वर्षापासून ऑफलाईन शाळा बंद होत्या. ऑनलाइन शाळांचे शासन व प्रशासनाच्या वतीने नियोजन करण्यात आले होते. परंतु आज ऑफलाईन शिष्यवृत्तीची परीक्षा भुसावळ शहरामध्ये घेण्यात येत आहे.
शहरातील एन. के. नारखेडे विद्यालयांमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सोडण्यात आलेला आहे. प्रत्येक वर्गाला सॅनीटायझर करण्यात आलेले आहे. या परीक्षा केंद्रावरती एकूण १०६ विद्यार्थी परीक्षा देत आहेत, परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची आरोग्याची काळजी घेण्यासाठी नगरपालिकेच्या आरोग्य खात्याच्या वतीने या ठिकाणी दोन आधीपरिचारकांची नेमणूक करण्यात आली आहे.