Home क्राईम खळबळजनक : भुसावळात लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून

खळबळजनक : भुसावळात लहान भावाने केला मोठ्या भावाचा खून


murder 0

भुसावळ (प्रतिनिधी) येथील गंगाराम प्लॉट परिसरात मध्यरात्री एका लहान भावाने आपल्या सख्या मोठ्या भावाचा खून केल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून चर्चेला उधान आले आहे.

 

या संदर्भात सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, गंगाराम प्लॉट परिसरातील चांडक बिल्डींग समोर पाटील परिवार राहतो. शुक्रवारी मध्यरात्री पावणे तीन वाजेच्या सुमारास घराच्या दुसऱ्या मजल्यावर स्वप्नील प्रल्हाद पाटील (वय २८) याने आपला सख्खा मोठा भाऊ योगेश प्रल्हाद पाटील (वय ३०) याला कोणत्या तरी कारणावरून जबर मारहाण केली. त्यानंतर त्याचा गळा चाकूने चिरला. यामुळे जखमी योगेशला अत्याव्यस्थ अवस्थेत गोदावरी रुगणालयात दाखल करण्यात आले. परंतू वैदयकीय सूत्रांनी योगेश मयत झाल्याचे घोषित केले. दरम्यान,शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा स्वप्नीलला पोलिसांनी ताब्यात घेतलेले होते. तर दोघं भावांमध्ये कशावरून वाद झाला आणि हत्या कशी झाली याबाबत अधिकाची माहिती मिळू शकली नव्हती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound