भुसावळ, प्रतिनिधी | येथील श्री सद्गुरु झेंडूजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार समाज संस्था व श्री महालक्ष्मी ग्रुपतर्फे सालाबादाप्रमाणे आपल्या समाज मंडळाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व वधू-वर परिचय पुस्तिका नियोजन संदर्भात महत्त्वाची बैठक रविवार (दि.१५) सकाळी १०.०० वाजता शहरातील किशोर पाटील यांच्या मळ्यात, जुना सातारा खळवाडी, येथे आयोजित करण्यात आली आहे.
श्री सदगुरू झेंडुजी महाराज बेळीकर लेवा पाटीदार समाज संस्था सर्व पदाधिकारी व सदस्य, महालक्ष्मी ग्रुपचे सदस्य व जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांचे सदस्य आणि समाज बांधव यांनी बैठकीला उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष दिनेश भंगाळे व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.