रक्तदानाचा रावेर पॅटर्न राज्यात राबवावा : न्या.आर. एल. राठोड

 रावेर, प्रतिनिधी ।  रावेर न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर. एल. राठोड यांचे संकल्पनेतून  मराठा मंगल कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा रावेर   पॅटर्न संपूर्ण राज्यात राबवावा अशी अपेक्षा न्या. आर. एल. राठोड यांनी यावेळी व्यक्त केली. 

 

मागील आठवड्यात  मुख्य न्यायाधीश आर. एल. राठोड यांच्या संकल्पनेतून रावेर येथिल सर्व अधिकाऱ्यांची आणि वकील संघाच्या झालेल्या बैठकीत रक्तदान  शिबिराच्या आयोजनाचे ठरविण्यात आले होते. यानुसार आज सोमवार २४ मे रोजी आयोजित रक्तदान शिबिरात  ७५  रक्तदात्यांनी रक्तदान केले. विशेष म्हणजे पोलिस अधिकारी, महसूल कर्मचारी, न्यायालयीन कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी व वकिल मंडळीने रक्तदान केले. याप्रसंगी न्या. राठोड यांनी जनतेला प्रशासनाच्या पाठीशी व कोरोनाबाबत काळजी घेण्याचे आवाहन केले. रावेरमध्ये ज्या प्रमाणे सर्व अधिकारी एकत्र येऊन काम करीत आहेत तसाच पॅटर्न पूर्ण राज्यात राबविण्यात यावा असेही आवाहन केले.  याप्रसंगी उपविभागीय अधिकारी कैलास कडलग,तहसीलदार उषाराणी देवगुणे, गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल, नगरपालिका मुख्याधिकारी रविंद्र लांडे, पोलिस उपनिरीक्षक शीतल नाईक, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. एन. डी. महाजन, वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. जगदीश महाजन, सचिव अॅड. डी. ई. पाटील, अॅड. व्ही. पी. महाजन,अॅड. योगेश गजरे, अॅड. मधुसूदन चौधरी, अॅड. प्रमोद विचवे, अॅड. जे. जी. पाटील, अॅड. प्रमोद पाटील, अॅड. मिलिंद पाटील, अॅड. किशोर पाटील, अॅड. सांगळे, डॉ. जे. जी. पंडीत आदी उपस्थित होते सूत्रसंचालन अॅड.. योगेश गजरे यांनी केले

 

Protected Content