एरंडोल, प्रतिनिधी । शहरातील सर्व गणेश मंडळ व भक्तांना नगरपालिका व पोलीस प्रशासनातर्फे शासनाच्या आदेशानुसार कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी श्री गणेश विसर्जन हे व्यक्तीगत न करता शासनाने ठरवुन दिल्याप्रमाणे, मंडळाच्या ठिकाणीच, स्वत:च्या घरातच किंवा श्री गणेशमूर्ती संकलन केंद्रावर करावयाचे आवाहन करण्यात आले आहे.
एरंडोल शहरात खालील ठिकाणी गणेशमूर्तीचे संकलन करण्यात येणार आहे. सर्व गणेश भक्तांनी ११ व्या दिवशी दि.१ सप्टेंबर या दिवशी आपल्या कडील श्री गणेश मूर्तीचे विधीवत पुजन करून, खालील ठिकाणी सकाळी १० ते ०७ वाजेच्या दरम्यान घरघुती व मंडळाच्या श्री गणेश मूर्तीचे संकलन करण्यात येणार आहे.
संकलीत केलेल्या श्री गणेश मूर्तीचे शासनाच्या निर्देशानुसार पुरोहितामार्फत विधीवत पुजा-अर्चना करून विसर्जन करण्यात येणार आहे. त्यामुळे श्री गणेश भक्तांनी, मंडळांनी, नागरिकांनी व्यक्तीगत, सामुहीकरित्या विसर्जन करण्यासाठी न जाता श्री गणेशाच्या मुर्तींना संकलन केंद्रावर देण्यात यावे असे म्हटले आहे.
यासाठी संकलनकेंद्र बचपन इंग्लिश स्कूल,जुना धरणगाव रोड, मरी माता मंदीर, कासोदा नाका, म्हासावद नाका जोहरी हॉल.या ठिकाणी श्री गणेश मूर्ती संकलीत करण्यात येणार आहे. वरील ठिकाणी संकलित झालेल्या श्री गणेश मूर्तींचे विसर्जन रथाद्वारे अंजनी धरणात पुरोहित द्वारे विधीवत पुजा आर्चा करून विसर्जन करण्यात येणार आहे.
यासाठी नागरिकांनी नगरपालिका व पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे त्याच प्रमाणे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गणेश मंडळ व भक्तांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे आवाहन मुखाधिकरी किरण देशमुख व पोलीस निरीक्षक स्वप्निल उनवणे यांनी केले आहे.