Home क्राईम बॉम्बच्या अफवेने विमानाचे तत्काळ लॅंडिंग

बॉम्बच्या अफवेने विमानाचे तत्काळ लॅंडिंग


 

 

 

 

 

search flights

चांगी (वृत्तसंस्था) मुंबई ते सिंगापूर जाणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याचा निनावी फोन आल्यानंतर विमानतळावर एकच खळबळ माजली. मुंबई ते सिंगापूर जाणारे सिंगापूर एअरलाइन्स कंपनीच्या विमानात कोणीतरी बॉम्ब ठेवला असल्याची माहिती दिली. यानंतर विमानातील प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण पसरले.

विमानातील पायलटला बॉम्ब असल्याची सूचना मिळाल्यानंतर तात्काळ पायलटने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग केले. चांगी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर हे विमान सुखरुप उतरवण्यात आले. या विमानात २६३ प्रवाशी प्रवास करत होते. विमान लॅंडिंग झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी विमानाची तपासणी केली त्यानंतर ही अफवा असल्याचं समोर आले.

सिंगापूर एअरलाइन्सचे विमान एसक्यू ४२३ स्थानिक वेळेनुसार ११.३५ मिनिटांनी मुंबईवरुन सिंगापूरसाठी उड्डाण घेतले. विमान उडल्यानंतर काही वेळात एअरलाइन्सला निनावी फोन आला, यामध्ये विमानात बॉम्ब ठेवण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला. यानंतर तातडीने विमान चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरक्षित उतरवण्यात आले.

विमानाची आपत्कालीन लॅंडिंग मंगळवारी सकाळी ८.०० वाजता झाली. विमानातील सर्व प्रवाशांना सुरक्षितरित्या उतरवण्यात आले. मात्र त्याआधी प्रवाशांनाही सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीला सामोरे जावे लागले. सुरक्षा अधिकाऱ्यांनी या विमानातील एक महिला आणि मुलाला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्या लोकांची चौकशी सुरु आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound