नवी दिल्ली (वृत्तसंस्था) समाजवादी पार्टीच्या माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान, त्यांना भाजपकडून रामपूरमधूनच तिकीट दिले जाणार असल्याची चर्चा आहे.
समाजवादी पार्टीचे नेते आजम खान यांच्याशी मतभेद झाल्यामुळे जयाप्रदा यांनी समाजवादी पार्टीला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्या आरएलडीमध्ये सामिल झाल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपात इनकमिंग सुरूच आहे. समाजवादी पक्षाच्या नेत्या आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज मंगळवारी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात जयाप्रदा भाजपात सामील झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित असल्याची प्रतिक्रिया यावेळी जयाप्रदा यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सारखं खंबीर नेतृत्व देशाला मिळाल्यामुळेच भाजपमध्ये प्रवेश करत आहे, असे देखील जयाप्रदा यांनी यावेळी सांगितले.