यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषदव्दारे परिषद कार्यक्षेत्रातील दोन मीटर उंची असलेली झाडे सेल्फ वॉटरींग ट्रिगार्डसहीत एका वर्षाच्या देखभाल तत्वावर कामासाठी पात्र उमेदवारास नियमबाह्य देण्यात आलेली निविदा तात्काळ रद्द करण्यात यावी, अश्या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते सुनिल गावडे यांनी मुख्याधिकारी बबन तडवी यांना दिले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रार निवेदनात सुनिल गावडे यांनी म्हटले आहे की, यावल नगर परिषदच्या कार्यक्षेत्रातील दोन मिटर उंचीचे झाडे व सेल्फ वॉटरींग ट्रिगार्ड सहीत एका वर्षाच्या देखभाल तत्वावर काम करणे, कामी नगर परिषदव्दारे काम देण्यासाठी शासनाने योग्य त्या वर्गात नोंदणीकृत मक्तेदार यांच्याकडून ई-निविदा बी-वन प्रमाणे येथील मक्तेदार प्रकाश पारधे व जळगाव येथील अनिल पाटील यांनी ई-निविदा समाविष्ठ केली असतांना, यात शासनाच्या निविदेमध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या डीएसआर सुचिप्रमाणे आयटीएम असुन या कामास सार्वजनिक बांधकाम विभागाची नोंदणीपत्र असणे आवश्यक आहे. हे बंधनकारक असतांना सुद्धा पात्र मक्तेदाराची निविदा रद्द करण्यात येवुन, ज्या व्यक्तिकडे शासनाने ठरवुन दिलेल्या अटीशर्ती संदर्भात कुठलेही कागदपत्रे नसलेल्या मक्तेदार व्यक्तिस निविदापेक्षा जास्तदराने असलेल्या व्यक्तिस हे काम देण्यात आले आहे. परंतू आमची निविदा ही कमी दराची असुन देखील आम्हाला या प्रक्रियेतून डावण्यात आले आहे. या संदर्भात नगर परिषदव्दारे शासन नियम धाब्यावर ठरवून देण्यात आलेली तात्काळ रद्द करण्यात यावी. रद्द न झाल्यास कायदेशीर तिढा निर्माण होईल अन् न्यायलयातून दाद मागावी लागेल, असा इशारा यावेळी सुनित गावडे यांनी तक्रार निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.