Home धर्म-समाज फेकरी येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंतीनिमित्त प्रतिमापूजन

फेकरी येथे संत शिरोमणी गुरु रविदास जयंतीनिमित्त प्रतिमापूजन


फेकरी, ता. भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील फेकरी येथे संत शिरोमणी गुरु रविदास यांची ६४८वी जयंती उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या सोहळ्यात श्री संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून फेकरी ग्रामपंचायत सरपंच चेतना भिरूड आणि भुसावळ औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे उपस्थित होते. दोघांनीही संत रविदास यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत त्यांच्या विचारांची महती सांगितली. यानंतर सरपंच चेतनाताई भिरूड यांच्या हस्ते मुख्य अभियंता प्रफुल्ल भदाणे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी ग्रामपंचायत फेकरी उपसरपंच प्रशिक जोहरे, ग्रामविकास अधिकारी एस.एस. सोये, महाजनेकोचे मुकेश मेश्राम, समाजसेवक प्रशांत निकम, संजय भिरूड, ग्रामपंचायत सदस्य सुनील बऱ्हाटे, चिंतामण सोनवणे, अशोक चिमणकर, अमोल सोनवणे, गणेश बाविस्कर, दिलीप तायडे, समाधान चिमणकर, निशांत निकम, प्रशांत वाघ, मोहित कांबळे, रोशन वाघ, गजानन चंदनकर आणि अनेक समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound