Home क्राईम मेहुणबारे येथे अवैध मद्यसाठा जप्त

मेहुणबारे येथे अवैध मद्यसाठा जप्त

0
51

चाळीसगाव प्रतिनिधी । तालुक्यातील मेहुणबारे येथे गुप्त माहितीवरून अवैध मद्यसाठा असणारे कंटेनर जप्त करण्यात आले असून यातून सुमारे दीड कोटींची दारू जप्त करण्यात आली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला अवैध दारू वाहून नेणार्‍या कंटेनरबाबत गुप्त माहिती मिळाली होती. यावरून या विभागाच्या पथकाने १.४२ कोटी रूपयांचे मूल्य असणारी दारू जप्त केली असून पाच जणांना अटक केली आहे. यात असलम अली खान ( मेवत हरीयाणा), मोहम्मद समीम अब्दुल (मेवत हरीयाणा), रवींद्र पावरा (धडगाव), खुर्शीद सरीफ खान (पलवल हरीयाणा) यांच्यासह एका अल्पवयीन मुलास अटक केली. यातील चौघांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound