बेकादेशीर बंगल्यात रहिवास; सेवानिवृत्त अधिक्षक अभियंतावर कारवाईची मागणी

 

यावल प्रतिनिधी । माजी राज्य माहिती आयुक्त तथा जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता यांनी जळगावातील निवासस्थानाचे एकूण 4 लाख 22 हजार रूपये भाडे थकीत असल्याचे माहिती अधिकारांतर्गत निदर्शनास आले. त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा यावल येथी तक्रारदार सुरेश जगन्नाथ पाटील यांनी केली आहे.

माजी राज्य माहिती आयुक्त तथा जळगाव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सेवानिवृत्त वसंत दत्तात्रय पाटील यांना जळगाव येथील शासकीय निवासस्थानाचे एकुण भाडे 4 लाख २२ हजार ५९ रूपये भरावे लागले. याबाबत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे जळगाव जिल्हयातील संघटक सुरेश जगन्नाथ पाटील रा.यावल यांनी 09 जुलै 2018 रोजी तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच माहितीचा अधिकार अंतर्गत 02 जानेवारी 2019 रोजी मिळालेल्या माहितीनुसार कार्यकारी अभियंता लघु पाटबंधारे विभाग यांच्याकडे पाटील यांनी दोन वेळा शासकीय घरभाडे भरले असल्याचे उघड झाल्याने माजी राज्य माहिती आयुक्ताला सुध्दा माहिती अधिकाराचा दणका बसला आहे.

आजही व्ही.डी.पाटलाचा शासकीय निवासस्थानावर अनधिकृत कब्जा
जलसंपदा पाटबंधारे अधिकारी शासकीय निवासस्थानात अनाधिकृत कब्जा करून बसलेले माजी राज्य माहिती आयुक्त तथा जळगांव पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता व्ही.डी.पाटील हे बेकायदा रहिवास करीत आहे. त्याबाबत व त्यांचे रहिवासाचे अतिक्रमण हटविणेबाबत व शासकीय निवासस्थान खाली करून घेणेबाबत 26 एप्रिल 2019 रोजी तक्रार करण्यात आली आहे.त्यामुळे आता व्ही.डी.पाटलांकडून शासकीय बंगला खाली होतो किंवा नाही याकडे तसेच संबंधित अधिकारी माजी राज्य माहिती आयुक्त तथा सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता पाटील यांच्या वैयक्तिक व राजकीय प्रभावाला बळी पडतात का? याकडे संपुर्ण जळगांव जिल्हयाचे लक्ष्य वेधुन आहे.

15 फेब्रुवारी 2014 चे स्वेच्छा निवृत्तीच्या अर्जानुसार 20 दिवसात स्वेच्छा निवृत्तीची परवानगी मिळवली आहे. अशाप्रकारे त्यांचा 20 ते 25 वर्षाचा सेवा तपशिल आहे. त्यांनी जळगाव येथील शासकीय निवासस्थान 8 ब मध्ये अंदाजे 20 ते 25 वर्षे एकाच ठिकाणी शासकीय निवासस्थान कायम ठेवले आहे. 02 जुलै 2014 मध्ये राज्य माहिती आयुक्त म्हणून व्ही.डी.पाटील यांनी मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्याकडून पद व गोपीनियतेची शपथ घेतली होती व आहे. सन 2019 मध्ये त्यांनी राज्य माहिती आयुक्त पदाचा राजीनाम दिला आहे. अशा परिस्थितीत त्यांनी आजही जळगांव येथील शासकीय निवासस्थान न सोडता आपल्या कब्जात बळकावून ठेवला आहे. राज्य माहिती आयुक्त पद प्राप्त करतांना वसंत दत्तात्रय पाटील यांनी शासनाची दिशाभुल व फसवणुक केलेली असल्याचे वसंत दत्तात्रय पाटील यांनी राज्य माहिती आयुक्त पदासाठी जे लाभ घेतले आहेत ते वसुल करून पुढील कार्यवाहीची मागणी भ्र.वि.जन आंदोलन न्यासचे संघटक सुरेश जगन्नाथ पाटील रा.यावल यांनी केली आहे.

Add Comment

Protected Content