मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा- बेकायदेशीर शिंदेसरकारचे बेकायदेशीर प्रवक्ते दिपक केसरकर यांचे शरद पवार यांच्यावरील वक्तव्य बेजबाबदारपणाचे असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवारसाहेबांवर दिपक केसरकर यांनी शिवसेना फोडल्याचा आरोप केला असून या आरोपाला महेश तपासे यांनी जशास तसे उत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर लोटांगण घालणाऱ्या बंडखोर आमदारांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वेदना देण्याची खरी कृती केली आहे तर आदरणीय शरद पवारसाहेबांनी त्यांचा स्वाभिमान, मैत्री जपण्याचे काम केल्याचे महेश तपासे यांनी सांगितले आहे.
शिवसेनेचा इतिहास किंवा जे लोक बाहेर पडले त्याची कारणे दिपक केसरकर यांना माहीत नसावी असा टोला लगावतानाच बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांची मैत्री सर्वश्रुत होती याची आठवणही महेश तपासे यांनी दिपक केसरकर यांना करुन दिली आहे.
जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी सेनेला झिडकारले त्यावेळी पवारसाहेबांनी शिवसेना – कॉंग्रेस – राष्ट्रवादी या तीन पक्षाची मोट बांधून महाविकास आघाडी तयार केली व शिवसेनेला मुख्यमंत्रीपद दिले हे दिपक केसरकर सोयीस्करपणे विसरले आहेत असेही महेश तपासे म्हणाले.