बेकायदेशीर वाळू वाहतूक: डंपर जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव शहरातील सुमनताई गिरधर पाटील शाळेसमोरून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर भडगाव पोलिसांनी कारवाई केली आहे. २४ मार्च रोजी पहाटे पाच वाजता पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी वाळूने भरलेला डंपर जप्त केला असून, या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डंपर चालक किरण साहेबराव पाटील (वय २७, रा. लोहटार, ता. पाचोरा) आणि ज्ञानदीप राजेंद्र महाजन (रा. पाचोरा) यांच्यावर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल सुशील सोनवणे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

भडगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी शहरातील विविध ठिकाणी गस्त वाढवली होती. २४ मार्च रोजी पहाटे सुमनताई गिरधर पाटील शाळेसमोरून एक डंपर वाळू घेऊन जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत डंपर जप्त केला.

Protected Content