रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । रावेर परीसरात अवैधरीत्या वाळू वाहतुकीला ऊत आला असून स्थानिक महसूल प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये वचक संपल्याचे चित्र आहे. या प्रकरणाकडे प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेकडून होत आहे.
रावेर तालुक्यातील सुकी नदी व भोकर नदी पात्रातुन पहाटे चार ते सातच्या दरम्यान नदी पात्रात अवैधरित्या ट्रक्टरे उतरवुन सर्रास अवैध वाळूची वाहतूक केली जात आहे. या वाळू चोरट्यांचा धुमाकुळ थांबता थांबेना झाला आहे. याला महसूल अधिकाऱ्यांचा संपलेला वचक कारणीभुत दिसत आहे. तसेच पाल तलाठी यांच्या दुर्लक्षामुळे येथून मोठ्या प्रमाणात सुकी नदीची वाळु अवैधरित्या रावेर शहरात येऊन चढ्याभावाने विक्री होत आहे. या संदर्भात पाल तलाठी गुणवंत बारेला यांच्याशी संपर्क केला असता. त्यांनी कॉल घेतला नाही. या सर्व प्रकरणाकडे फैजपुर प्रांतधिकारी कैलास कडलग यांनी लक्ष देण्याची मागणी जनतेतुन होत आहे.