यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली गावाजवळ एका शेतकर्याने आपल्या शेतात विना परवाना वाळुची साठवण केल्याचे महसुल प्रशासनाने केलेल्या कारवाई उघडकीस आले आहे.
या संदर्भात महसुल प्रशासनाकडुन मिळालेल्या माहीतीनुसार तालुक्यातील कोरपावली गावाजवळ यावल शहराकडे जाणार्या मधल्या रस्त्यावर असलेल्या कमलाकर तुकाराम नेहते यांच्या शेतात बेकायद्याशीररित्या सुमारे ३५ते४० ब्रास वाळु साठवण करून ठेवल्याचे मिळुन आले आहे. याबाबत कोरपावली विभागाचे मंडळ अधिकारी शेखर ए. तडवी तथा कोरपावलीचे तलाठी मुकेश तायडे यांनी शेतात जावुन या बेकायदेशीरपणे साठवण करून ठेवलेल्या वाळुचा पंचनामा केला असुन, तसा अहवाल तहसीलदार महेश पवार यांच्याकडे देण्यात आले आहे.
संबंधीत साठा करणार्या शेतमालकावर शासकीय नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे महसुल प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावल परिसरात विविध ठिकाणी अशाच प्रकारे मोठया प्रमाणावर बेकायद्याशीररित्या उपसा करून आणलेली वाळुची साठवण करण्यात आली असल्याचे वृत्त असुन , शहरात चालणार्या शासकीय किंवा खासगी बांधकामावर ही वाळु छुप्या मार्गाने वाढत्या किमतीत दिली जात असल्याचे कळते. याकरीता महसुल प्रशासनाने रात्रीच्या वेळीस गस्ती वाढविल्यास या प्रकारास प्रतीबंध करता येईल.