Home क्राईम ढाब्यावर अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर कारवाई

ढाब्यावर अवैधरित्या दारू विक्रेत्यांवर कारवाई


यावल ( प्रतिनिधी ) जळगाव येथील स्थानिक गुन्हे शाखा पोलीस स्टॉप साकळी येथील विजय सिंग नथ्थु सिंग लोधी उर्फ डॅनी याचे यावल अडावद रस्त्यावरील साखळी बसस्थानकावर असलेल्या राजपूत ढाब्यावर 18 मार्च 19 रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास देशी-विदेशी दारू विक्री करत असताना रंगेहात पकडले त्याचेकडून 16 सीलबंद दारू टॅंगो महाराजा संत्रा 16 बाटल्या ऑफिसर चॉईस व्हिस्की 7 बाटल्या असे एकूण 2504 रुपये किमतीचा माल हस्तगत केला.

या छाप्यामध्ये जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर लहारे पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल इंगळे नाईक पोलीस कॉन्स्टेबल संतोष मायकल पोलीस नाईक रमेश चौधरी मिलिंद सोनवणे आणि चालक दर्शन ढाकणे यांनी ही कारवाई केली आरोपी विरुद्ध यावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून त्याला ताब्यात घेतले आहे याबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल स्थानिक गुन्हे शाखा सुरेश बाबुराव महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound