विवरा व भोर येथून अवैध दारू जप्त; उत्पादन शुल्क विभागाची कारवाई;

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत आहे. याची दखल घेत उत्पादन शुल्क विभागाने कारवाई केली असून, विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत देशी व विदेशी दारू जप्त करून दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

या बाबत वृत्त असे आहे की, रावेर तालुक्यात उत्पादन शुल्क विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून देशी व विदेशी दारू विक्री सुरू असल्याच्या तक्रारी जनतेतून येत होत्या. परंतु, उत्पादन शुल्क विभागाचे याकडे जाणून-बुजून दुर्लक्ष होत होते. उत्पादन शुल्क विभागाचे यावल येथील उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे आणि उत्पादन शुल्क कॉन्स्टेबल नंदू नन्नवरे यांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करून गुन्हा दाखल केला आहे.

विवरा व भोर येथे उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत दोन गुन्हे दखल करण्यात आले आहेत. यामध्ये ५० लिटर गावठी दारू तसेच १७.२८ लिटर देशी दारू जप्त करण्यात आली आहे. एकूण १२,३१५ रूपयांची दारू जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Protected Content