Home क्राईम बोदवड येथे ढाब्यावर अवैध दारू जप्त

बोदवड येथे ढाब्यावर अवैध दारू जप्त

0
35

बोदवड प्रतिनिधी । येथे महाराष्ट्र दिनी आशीर्वाद ढाब्यावर अवैध दारू विक्री होत असल्याचे आढळून आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१ मे रोजी महाराष्ट्र दिनी संपूर्ण राज्यात दारू बंदी असताना मलकापूर रोडवर असलेल्या आशीर्वाद ढाब्यावर भुसावळ पोलिसांनी रात्री एक वाजेच्या सुमारास ८५६ रुपयाची दारू जप्त केली. आशीर्वाद ढाब्याचा मालक निलेश बाबुराव माळी ( वय ३० ) याच्यावर पोलीस कॉस्टबाल भूषण संजय चौधरी यांनी फिर्याद देऊन मुंबई दारूबंदी अधिनियम १९४९ अंतर्गत कलम ६५(एफ) व (इ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. बोदवड तालुक्यात अवैध दारू विक्री जोरात सुरू असून बोदवड प्रशासनावर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाले आहे बोदवड पोलिस स्टेशन अंतर्गत येऊन भुसावळ येथील पोलीस कारवाई करतात यामुळे आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound