यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरासह तालुक्यात अवैध गुटख्याचा काळा धंदा मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे वृत्त लाईव्ह ट्रेंडस न्यूजने प्रकाशित केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत न्हावी येथून तब्बल सव्वा पाच लाख रूपयांचा प्रतिबंधीत गुटखा जप्त केला आहे. यामुळे आमच्या वृत्त्तावर या कारवाईने शिक्कामोर्तब झाले असून आता अशीच कार्यवाही प्रत्येक गावात करण्याची मागणी होत आहे.

या संदर्भातील माहिती अशी की, यावल तालुक्यात प्रचंड प्रमाणात अवैध गुटखा विक्री होत असल्याची धक्कादायक माहिती असून आम्ही या संदर्भात सातत्याने वार्तांकन केले. याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली. स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेका कमलाकर बागुल,पोना.रंजीत जाधव यांच्या पथकाने यावल तालुक्यातील न्हावी गावात छापा टाकला.
या पथकाने न्हावी येथील सुरेश किराणा दुकानात व मोहिनी कुंज इमारतीच्या पहिल्या माळ्यावर अचानक धाड टाकून अनुक्रमे १ लाख ५८ हजार ७२४ व ३ लाख ६६ हजार असा एकूण ५ लाख ६६ हजार ७२९ रुपयाच्या मुद्देमालासह संशयितआरोपीस ताब्यात घेतल्याची घटना काल शनिवार दि.२३ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी घडल्याने भादंवि कलम ३२८,२७२,२७३,१८८ प्रमाणे कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी सुनिल अशोक माखीजा ( वय ४१ वर्षे व्यवसाय किराणा दुकान रा.न्हावी ता. यावल ) तसेच अशोक मगनलाल माखीजा (वय ६५ वर्षे व्यवसाय किराणा दुकान रा.न्हावी ता. यावल ) हे गुटखा गुटख्याची अवैधरित्या विक्री करीता ताब्यात ठेवलेला माल मिळून आल्याने मुद्देमाला सह त्यांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणले सदर गुन्ह्याबाबत भादवी कलम ३२८,२७२,२७३,१८८ प्रमाणिक कारवाई करण्यात आली.
दरम्यान, न्हावी येथील कारवाईने यावल तालुक्यातील अवैध धंद्यांवर शिक्कामोर्तब झाले असून प्रत्येक गावात याच प्रकारे मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसाय सुरू असून त्यांच्यावर देखील कार्यवाही करावी अशी मागणी आता करण्यात येत आहे.