चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील अनेर नदीजवळ नाकाबंदी करत असताना पोलिसांना एका होंडा शाई चालकावर संशय आल्याने त्याला थांबवत तपासणी करण्यात आली. त्यावेळी आरोपीकडे 50 ते 60 लिटर इसतारा दारु साठा आढळून आल्याने पोलिसांनी मुद्देमालासह आरोपीला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्याहुन 24 किमी अंतरावर असलेले सत्रासेन गावातील अनेर नदीजवळ नाकाबंदी करत असताना पोलीस कॉन्टेबल रविंद्र बोरसे, अमोल जाधव, लिलाधर पाटील आणि सुमेर वाघरे यांनी एका होंडा शाई (एमपी10 एमजे 2529) चालकावर संशय आल्याने पोलिसांनी त्याला थांबविले आणि तपासणी करण्यास सुरुवात केली. तर त्याच्याजवळ तब्बल 50 जे 60 लिटर इसतारा दारु साठा आढळून आला आहे. सिताराम जवानसींग बारेला असे आरोपीचे नाव असून मुद्देमालासह त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. ही माहिती मिळताच गावातील पोलीस पाटील आणि योगेश सोनवणे हे देखील घटना स्थळी दाखल झाले. यावेळी जळगाव पोलीस कॉन्टेबल आणि होमगार्ड अशोक डी.बागुल व राजू.बी.माळी हे देखील उपस्थितीत होते.