वाहतुकीचे नियम पाळून वाहने चालविल्यास अपघातांचे प्रमाण कमी होईल – ॲड.अर्जुन पाटील

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । बोदवड विधीसेवा प्राधिकरणाचा व बोदवड पो.स्टे. यांच्या संयुक्त विद्यमानाने बोदवड पोलीस ठाण्यात नुकतेच रस्ते सुरक्षा, वाहन कायदा याबाबत जनजागृतीबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

यावेळी ॲड.अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ यांनी  वाहतुकीचे नियम पाळणे ही सामूहिक जबाबदारी आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करून अपघाताचे प्रमाण कमी होईल, असे प्रतिपादन ॲड.अर्जुन पाटील यानीं या कार्यक्रमात केले. वाहतूक नियम मोडणे महागात पडणार, नशेत गाडी चालवल्यास  १० हजार रुपये दंड आहे.सिग्नल तोडणे, विरुद्ध दिशेने गाडी चालवणे, हेल्मेट न घालणे किंवा सीट बेल्ट न लावता गाडी चालवणे असे प्रकार वाहन चालक सर्रासपणे करत असल्याचे दिसतात. वाढते रस्ते अपघात आणि त्यामध्ये होणारे मृत्यू पाहता काही महिन्यांपूर्वीच केंद्र सरकारने वाहतूक नियम मोडणाऱ्या शिक्षेच्या आणि दंडाच्या रकमेत मोठी वाढ केली आहे.

 

मात्र त्यानंतरही वाहन चालक हे नियम पाळत नसल्याने मा.सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार बोदवड तालुका विधी सेवा प्राधिकरण व बोदवड न्यायालय, बोदवड पोलिस प्रशासन यांच्या मार्फत सदर कार्यक्रम घेण्यात आला. प्रभावी वाहतूक व्यवस्थेबरोबरच वाहन चालकांनी वाहतूक नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नियम पाळूनच अपघात टाळता येतील.

 

मोटार वाहन अपघाताला आळा बसावा व नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांचा प्रचार व प्रसार होण्याकरिता सदर  कार्यक्रमाचे  आयोजित करण्यात आले होते. यावेळी   वाहतूक नियमांचे रिक्षा व वाहन चालक यांना ॲड. अर्जुन पाटील अध्यक्ष बोदवड तालुका वकील संघ,उपाध्यक्ष ॲड. धनराज सी. प्रजापती, ॲड.आय.डी पाटील,ॲड.के.एस इंगळे यांनी अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले.

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटन न्यायाधिश क्यु.यु.एन शरवरी हे होते.यावेळी उपस्थित मान्यवरांचा  सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमास पो.नि.राजेंद्र गुंजाळ,नगरअध्यक्ष आनंदा पाटील, नगरसेवक गोलु बरडीया, हर्षल बडगुजर, जिया शेख, अविनाश पोफळे, फोटोग्राफर निशांत पवार, सहकारी राहुल सपकाळे,रूपेश माळी पोलीस कर्मचारी वर्ग, रिक्षा चालक व वाहन चालक मोठ्या संख्येने हे उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन हे शैलेश पडसे यांनी केले.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी केस वॉच राजेंद्र महाजन,पोलीस कर्मचारी वर्ग यांनी परीश्रम घेतला.

Protected Content