भुसावळ, प्रतिनिधी | देशात महिलांच्या संरक्षणार्थ अनेक कायदे आहेत. महिलांचे शोषण होत असेल तर आयोगाकडे हक्काने यावे. महिला आयोग म्हणजे दुसरे माहेर असल्याचा विश्वास राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यानीत दिला. त्या शुक्रवार २६ जुलै रोजी ‘प्रभाकर हॉल’ मध्ये आयोजित तालुकास्तरीय कार्यशाळेत बोलत होत्या.
याप्रसंगी आ. संजय सावकारे, पंचायत समिती सभापती प्रीती पाटील, तहसीलदार महेंद्र पवार, गट विकास अधिकारी विलास भाटकर, पंचायत समिती उपसभापती वंदना उन्हाळे, सदस्या मनीषा पाटील, बाल विकास प्रकल्प अधिकारी गायकवाड मँडम, प्रा. नेवे, सुधीर जावळे आदी उपस्थित होते.श्री. सूर्यवंशी यांनी महिलांना बचत गटाचे महत्व व विविध योजनाबाबत मार्गदर्शन केले. रहाटकर यांनी प्रतिकूल परीस्थित सापडलेल्या तसेच पिडीत महिलांना संरक्षण देण्याचे काम आयोगाकडून केले जाते. महिला आयोग म्हणजे महिंलांचे हक्काचे माहेर आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. राज्यातील सर्व महिलांना बचत गटातील महिलांना प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने कार्यशाळा आयोजित केल्या जात आहेत. यामध्ये महिला विषयक कायद्याविषयी माहिती, शासनाच्या विविध योजनांची माहिती आदीविषयी रहाटकर यांनी माहिती दिली, आयोगातर्फे महिला बचत गटांना प्रशिक्षण, निर्मिती व विक्री सहाय्य या तीन टप्प्यामध्ये आयोगाकडून सहकार्य करण्यात येईल अशी ग्वाही रहाटकर यांनी यावेळी दिली. आमदार संजय सावकारे यांनी सुद्धा महिलांच्या विविध शासकीय योजनाची माहिती दिली. सूत्रसंचालन रागिणी चव्हाण यांनी तर आभार राजू फेगडे यांनी केले.