बहुमत होते तर भाजपला डाकूंसारखी दरोडेखोरी करण्याची गरज काय होती : संजय राऊत

images 1537252983670 239470 sanjay raut

मुंबई (वृत्तसंस्था) तुमच्याकडे बहुमत होते. तुम्ही ते राज्यपालांना दाखवले आणि शपथ घेतली. जर बहुमत होते तर चंबळच्या डाकूंसारखी ही गुंडगिरी, दरोडेखोरी करण्याची गरज काय होती?, असा सवाल शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

 

यावेळी राऊतांनी भाजपाकडून राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप केला. गुरुग्राममधील हॉटेल ऑबोरॉयमध्ये रुम क्रमांक ५११७ मध्ये राष्ट्रवादीचे आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला. तेथे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते पोहचले. तेथून त्यांना सोडवण्यात आले आहे. त्यानंतर त्या आमदारांनी त्यांना भाजपाने काय ऑफर दिली आणि कशाप्रकारे दमदाटी केली याबद्दल सांगितले. या सर्व गोष्टी देशाच्या लोकशाहीला शोभणाऱ्या नाहीत. दौलत दरोडा, नरहर हिरवळ, अनिल पाटील या आमदारांना गुरुग्रामच्या हॉटेलमध्ये कोंडून ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी तेथे काही गुंड आणि हरियाणामध्ये सत्ता असल्याने तेथील पोलिस ठेवण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद तसेच सत्ता मिळवण्यासाठी या देशातील राज्यकर्ते कोणत्या थराला जात आहेत हे घ्रृणास्पद, असल्याचेही राऊत यांनी केला.

Protected Content