सफाई कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास अ. भा. मजदूर काँग्रेस संघटनेचा मतदानावर बहिष्कार

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील सफाई कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास येत्या विधानसभेच्या निवडणुकीत मतदानावर कुटुंबासह बहिष्कार टाकणार असल्याची माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप चांगरे यांनी मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पद्मालय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन दिली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, राज्यातील सफाई कर्मचाऱ्यांच्या अनेक वर्षांपासून मागण्या प्रलंबित आहेत. राज्य शासन हे कामगार संघटनेसोबत कोणत्याही प्रकारचे चर्चा करण्याचा प्रयत्न करत नाही, उपेक्षित समाज वर्गावर दुर्लक्ष करून अन्याय करायचा प्रयत्न सत्ताधारी सरकार करीत आहे. अलीकडे राज्य शासनाकडून अनेक लहान समाज वर्गासाठी आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने घोषणा करून करोडो रुपयांचे आर्थिक तरतूद जाहीर केली आहे. परंतु सफाई कर्मचारी हे गेल्या २० ते २५ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी निवेदन, आंदोलन व मोर्चा काढण्यात आला पंरतू मागण्यांकडून शासनाने दुर्लक्ष केले आहे. दरम्यान सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य न झाल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत कुटुंबासह मतदानाला बहिष्कार टाकण्यात येणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेस संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष दिलीप चांगरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आ

Protected Content