Home Cities जळगाव बीओटी गैरव्यवहारात महाजनांचा सहभाग असेल तर चौकशीतून समोर येईल-खडसे (व्हिडीओ)

बीओटी गैरव्यवहारात महाजनांचा सहभाग असेल तर चौकशीतून समोर येईल-खडसे (व्हिडीओ)


जळगाव प्रतिनिधी । जामनेर येथील बहुचर्चीत बीओटी गैरव्यवहारात गिरीश महाजन यांचा सहभाग असेल तर तो चौकशीतून समोर येईल असे प्रतिपादन आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी केले.

पत्रकारांशी बोलतांना खडसे म्हणाले की, जामनेर बीओटी प्रकरणात टेंडर हे शर्मा यांच्या नावाने निघाले असून काम दुसर्‍यानेच केलेले आहे. यात खूप अनियमितता आहे. यात उर्दू शाळेला पैसे भरण्यात आलेले नाही. तसेच यात अनेक नियमांचा भंग करण्यात आलेला आहे. या संदर्भात त्री-सदस्यीय समिती नेमण्यात आलेली आहे. यामध्ये आ. गिरीश महाजन यांचा सहभाग असल्याचा आरोप असल्याचे अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांनी केले आहेत. मात्र यातून चौकशीत समोर काय ते येणार असल्याचे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound