Home राजकीय चंद्रकांत पाटील हिंमत असेल तर माढ्यातून लढाच : अजित पवार

चंद्रकांत पाटील हिंमत असेल तर माढ्यातून लढाच : अजित पवार


पिंपरी चिंचवड (वृत्तसेवा) महसूलमंत्री चंद्रकांत पाटील काहीही बरळू लागले आहेत. म्हणे यावेळी पवार साहेबांचा पराभव होणार आहे. त्यांनी आपली पाटीलकी सांभाळा, ती व्यवस्थित कशी राहिल हे पाहावे. उगाच काहीही गरळ ओकू नये आणि त्यांच्यात असेल हिंमत तर त्यांनी माढ्यातून लढावं. नाही चितपट केले तर नावाचं सांगणार नाही,” असे खुले आव्हान अजित पवार यांनी ना.चंद्रकांत पाटील यांना दिले आहे. पिंपरी चिंचवडमधील भोसरीत झालेल्या जाहीर सभेत अजित पवार बोलत होते.

चंद्रकांत पाटील तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही माढ्यातून लढाच. तुम्हाला चितपट केले नाही तर नाव सांगणार नाही,” असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी दिले आहे. हा बाबा स्वप्नात आहे की बावचळून गेलाय कोणाला माहिती. ना कधी खासदारकी लढले ना आमदारकी अन् तरी आम्हाला फुकटचे सल्ले द्यायला द्यायला निघाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. मात्र जर त्यांनी निवडणूक लढवली तर इतिहासात पहिल्यांदाच त्यांना पराभवाला सामोरे जावे लागेल. त्यामुळे त्यांनी वयाचा आणि तब्येतीचा विचार करुन निवडणूक लढवू नये. माढा आणि बारामत या जागी युतीचेच उमेदवार जिंकतील,” असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील कार्यक्रमात केले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound