
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रातील अतुलनीय कार्यासाठी कै. सुनीता जगन्नाथ वाणी भगीरथ इंग्लिश स्कूल, जळगाव येथील आदर्श शिक्षक किरण विठ्ठल पाटील यांना ‘राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार ठाणे येथे समर्थ फाउंडेशन आणि एज्युरीक हब ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एका विशेष समारंभात प्रदान करण्यात आला.

माजी न्यायाधीश कविता बाकरे, सी.ए. वैभव सिंघवी, अँड. सुनीता साबळे आणि डॉ. दीपक साबळे यांच्या शुभ हस्ते किरण पाटील यांना शाल, श्रीफळ, फेटा, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह (मोमेंटो) देऊन गौरवण्यात आले. त्यांच्या या कार्याची राज्य पातळीवर दखल घेतल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
आदर्श शिक्षक किरण पाटील यांना ‘राज्यस्तरीय समाज भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आल्याबद्दल त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. निकम, उपमुख्याध्यापक जे. एस. चौधरी, पर्यवेक्षक के. आर. पाटील, ज्येष्ठ कला शिक्षक एस. डी. भिरुड तसेच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे. त्यांच्या या यशाने शाळेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. किरण पाटील यांच्या कार्यामुळे इतर शिक्षकांनाही प्रेरणा मिळेल अशी भावना व्यक्त केली जात आहे.



