Home Cities जळगाव प्रभाग १७ मध्ये इबा पटेल यांचा झंझावात; जनतेने दाखवला विजयाचा विश्वास

प्रभाग १७ मध्ये इबा पटेल यांचा झंझावात; जनतेने दाखवला विजयाचा विश्वास


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार इब्राहिम मुसा पटेल उर्फ इबा पटेल यांना नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसत आहे. प्रचाराच्या विविध टप्प्यांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधताना इबा पटेल यांना मिळणारा प्रतिसाद पाहता प्रभागातील राजकीय चित्र स्पष्टपणे त्यांच्या बाजूने झुकताना दिसत आहे.

लाईव्ह ट्रेंड्स न्यूजशी बोलताना अनेक स्थानिक नागरिकांनी इबा पटेल यांच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले. “इबा पटेल हे नेहमी लोकांमध्ये असणारे, अडचणी त्वरित सोडवणारे नेतृत्व आहे. त्यामुळेच या वेळी प्रभागातील त्यांच्यासोबत असलेले तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील,” असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला.
प्रचारादरम्यान घराघरात पोहोचून संवाद साधणे, स्थानिक प्रश्न समजून घेणे आणि विकासाच्या ठोस मुद्यांवर बोलणे ही इबा पटेल यांची शैली मतदारांना भावत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि युवकांसाठी संधी या मुद्द्यांवर त्यांनी मांडलेली भूमिका प्रभागातील जनतेत सकारात्मक प्रतिसाद निर्माण करत आहे.

प्रभाग क्रमांक १७ मध्ये सध्या उत्साही वातावरण असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रचाराला चांगली गती मिळालेली आहे. नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता इबा पटेल आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा विजय निश्चित असल्याची भावना प्रभागात अधिकाधिक दृढ होत चालली आहे.


Protected Content

Play sound