Home राजकीय मोदींसोबतच राजकारण सोडणार- इराणी

मोदींसोबतच राजकारण सोडणार- इराणी

0
30

पुणे प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातून सेवानिवृत्ती घेतल्यास आपणदेखील त्यांच्या सोबतच राजकारण सोडणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी येथे केले.

पुणे येथील एका कार्यक्रमात केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी केलेले वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे. त्या म्हणाल्या की, गुजरातमध्ये राज्यसभेची उमेदवारी देत नरेंद्र मोदी यांनी मला खासदार केले. प्रारंभी मनुष्यबळ विकासमंत्री आणि आता वस्त्रोद्योगमंत्री अशी महत्त्वाची जबाबदारी सोपविली. यामुळे मोदी राजकारणातून बाजूला होतील त्या दिवशी मीदेखील निवृत्त होईन. दरम्यान, त्यांनी अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत पक्षाध्यक्ष अमित शहा घेतील तो निर्णय मान्य असेल, असे विधान त्यांनी केले. याप्रसंगी त्यांनी गांधी कुटुंबावर जोरदार टीका केली. चार पिढया मतदारसंघातील शेतकर्‍यांकडे ज्यांनी बघितले नाही ते देशातील शेतकर्‍यांचे काय भले करणार, असा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा नामोल्लेख टाळून त्यांनी सवाल केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound