माझं नाव राहुल सावरकर नाही, मी माफी मागणार नाही

rahul gandhi

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील बलात्काराच्या वाढत्या घटनांवर बोलताना राहुल गांधी यांनी ‘रेप इन इंडिया’ असा उल्लेख केला होता. या वक्तव्यावरून राहुल गांधी माफी मागावी अशी मागणी भाजपने केली होती. मात्र मी माफी मागणार नाही. “मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे”, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. मी मरेन मात्र माफी मागणार नाही.

 

देशातील वाढत्या बलात्काराबद्दल सरकार टीका करताना राहुल यांनी एका सभेत ‘मेक इन इंडिया’चा प्रवास ‘रेप इन इंडिया’च्या दिशेने सुरू असल्याचे म्हटले होते. त्यावरून संसद अधिवेशनात भाजपच्या खासदारांनी राहुल यांना घेरले होते. राहुल गांधी यांनी देशातील महिलांचा अपमान केला आहे. त्यांनी देशाची माफी मागावी, अशी मागणी भाजपच्या खासदारांनी केली होती. त्यावर काँग्रेसने नवी दिल्लीतील रामलीला मैदानावर केलेल्या ‘भारत बचाव’ आंदोलनात राहुल गांधी यांनी टीका केली. राहुल म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी देशाची माफी मागायला हवी. मोदींचे असिस्टंट अमित शाह यांनी देशाची माफी मागायला हवी. या देशाची शक्ती, अर्थव्यवस्था संपूर्ण जग पाहायचा. मात्र आज देशात काय होत आहे, असा सवाल राहुल गांधींनी विचारला. या देशाची शक्ती या देशाची अर्थव्यवस्था होती मात्र आज ती राहिलेली नाही. संपूर्ण जग मिळून भारताच्या अर्थव्यवस्थेचं कौतुक करत होतं. जग आशियाचे भविष्य चीन आणि भारत असल्याचे सांगत होते. त्यामुळे या शक्तीला ‘चिंडिया’ नावाने संबोधले जात होते. मात्र, आता आपण दोनशे रुपये किलोने कांदा विकत घेत आहोत. मोदींनी नोटाबंदी करुन स्वतः देशाची अर्थव्यवस्था संपवली आहे.

Protected Content