सावदा ता, रावेर प्रतिनिधी । वडगाव, उटखेडा ,विवरा, गौरखेडा येथील शेती शिवारातील शेतकऱ्यांना त्याचे वीज मोटर पंपासाठी पुरेशा दाबाने विज पुरवठा व्हावा आणि चिंचाटी वडगाव शिवारात नविन विज सबस्टेशनची निर्मिती करण्यात यावी अश्या मागणीसह इतर मागण्यांसाठी आमदार शिरीष चौधरी यांना शेतकऱ्यांनी नुकतेच निवेदन दिले आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून वडगाव ,विवरा, उटखेडा येथील शेती शिवारातील शेतकऱ्यांचा विज मोटर पपाना कमी दाबाने विज पुरवठा होतो या मुळे शेत शिवारातील ट्रान्सफॉर्मर वेळोवेळी जळणे व विविध विजेच्या समश्यामुळे शेतकऱ्यां च्या बागायती वर परिणाम होवून ऐन उन्हाळ्यात शेतकरी त्रस्त होतात या मुळे वडगाव शिवारात विज सबस्टेशन होणे आवश्यक असल्याने या संबंधीची मागणी ह्या शिवारातील शेतकऱ्यांनी आज आमदार शिरीष दादा चौधरी यांना निवेदन देवून मागणी केली.
तसेच गौरखेडा सबस्टेशन बाबत ही निवेदन दिले , त्याप्रमाणे कुंभारखेडा गाव ते स्मशानभूमी पर्यंत स्टीट लाईन च्या कामाला प्राधान्य देण्यात यावे, आणि चिनावल येथील उटखेडा कुंभार खेडा चौफूली ते चंद्रमा ग्रामिण पतसंस्था पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण ही वाढवून मिळावे,कारण प्रमुख रहदारी उटखेडा, कुंभारखेडा, गौरखेडा, लोहारा चिंचाटी खिरोदा कोचूर या गावांची दररोज मोठ्या प्रमाणात जड वाहतूक ही नेहमीच होत असल्याने गावकऱ्यांसमोर मोठी समस्या निर्माण झाली असून यामुळे संबंधित परिसरात शेतकरी, सर्व सामान्य जनतेला दळणवळण बिकट परिस्थितीला तोंड द्यावे लागते, म्हणून ऐवढा रस्ता दुरुस्तीचे काम लवकर सुरू करावे, आणि सदर रहदारीचा अडथळा दूर करावा, अशी मागणी यावेळी संजीव महाजन , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गोपाळ नेमाडे , किरण निंबा नेमाडे , भास्कर सरोदे चिनावलकर तर कुंभारखेडा येथील विलास ताठे कार्याध्यक्ष रावेर तालुका राष्ट्रवादी यांच्या सह शेतकरी व नागरिकांनी हजर राहून निवेदन दिले सदर निवेदनाच्या प्रति संबंधित विज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही देण्यात येणार आहे, तसेच संबंधित अधिकारी वर्गाकडे शिरीष दादा चौधरी यांनी लगेच संवेदनशीलता दाखवून तात्काळ संबंधितांशी पत्रव्यवहार केला.