मी जन्मतः शिवसैनिक, चौकीदार होण्याची गरज नाही – उद्धव ठाकरे

3Uddhav Thackeray 8

मुंबई (वृत्तसंस्था) मी जन्मतः शिवसैनिक असून चौकीदार होण्याची गरज नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनासाठी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले असून मंगळवारी ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे.

 

युतीनंतर आमच्यात एक गलथानपणा आला, तो आता राहणार नाही अशी कबुली यावेळी उद्धव ठाकरेंनी दिली. मोदी सरकारला अजून पाच वर्ष दिली पाहिजेच असे देखील मत श्री.ठाकरे यांनी व्यक्त केले. गेल्या पाच वर्षात कधीही मी सरकारला दगा दिला का ? असे विचारताना घोषणांच्या पिकाला कधी कोंब येणार आहे की नाही ? अशी विचारणाही उद्धव ठाकरेंनी केली. भारत काँग्रेसमुक्त झाल्यामुळे सगळे प्रश्न मिटतील असे तुम्हाला वाटते का ? असे विचारले असता नष्ट किंवा काँग्रेसमुक्त अशा फालतू कल्पना माझ्याकडे नाहीत असे त्यांनी सांगितले. अयोध्येला जाण्यासंबंधी विचारले असता राम मंदिराच्या कामाला गती मिळाली नाही तर पुन्हा अयोध्येला जाईन, असे त्यांनी म्हटले आहे.

Add Comment

Protected Content