‘मी आणि पाणी’ कार्यशाळेत १५० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

kce

जळगाव प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाउंडेशन आणि केसीई सोसायटी संचालित मूळजी जेठा महाविद्यालय ‘जलश्री’ वॉटरशेड सर्व्हेलन्स अण्ड रिसर्च इन्स्टिट्युट यांच्या संयुक्त विद्यमाने मूळजी जेठा महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी ‘मी आणि पाणी’ या विषयांतर्गत दोन तासांची कार्यशाळा आयोजन कण्यात आले होते.

उपस्थित मान्यवरांकडून केले मार्गदर्शन
पाणी जपून वापरा येणाऱ्या पीढीसाठी आपल्याला पाणी वाचवायचे असेल तर काय करावे लागेल त्याची जबाबदारी कशी घ्यावी याबद्दल सोप्या आणि माहितीपूर्ण कार्यशाळेस जलश्रीच्या डॉ. स्वाती संवत्सर आणि डॉ. मिलिंद पंडित यांनी मुलांना समजेल अशा स्वरूपात दृकश्राव्य माध्यमाचा उपयोग करून मार्गदर्शन केले. या कार्यशाळेस सुमारे १५० हून अधिक विद्यार्थी विद्यार्थीनी सहभागी झाले होते. कार्यशाळेत ज्या विद्यार्थ्यांनी जल बचतीचे उपाय सूचविले, ज्यांनी चित्र, व्यंगचित्राच्या माध्यमातून संदेश दिले त्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केले गेले. ‘जलश्री’ वॉटरशेड सर्व्हेलन्स अण्ड रिसर्च इन्स्टिट्युट’पाणी सप्ताह साजरा करत आहे. १६ ते २२ मार्च या सप्ताहात १८ तारखेला बोदवड येथे शेतकऱ्यांसाठी “पाणी वाचवा’ याविषयावर कार्यशाळा घेण्यात आली.दि.२२ ला भौगोलिक माहितीशास्त्र (जिओइन्फोमार्टीक)काळजी याविषयावर शिक्षकांसाठी,दि.२३ ला जैवविविधता समज आणि संरक्षण याविषयावर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी तर दि.२४ स्त्रिया आणि पाणी या विषयांवर चर्चासत्र होणार आहे असे यावेळी जलश्रीच्या डॉ. स्वाती संवत्सर आणि डॉ. मिलिंद पंडित यांनी सांगितले.

Add Comment

Protected Content