मुंबई (वृत्तसंस्था) केवळ मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेची नाराजी नाही तर शिवसेनेच म्हणणे आहे जे ठरले त्याप्रमाणे व्हावे. त्यामुळे ज्यांच्यासमोर जे काही ठरले आहे ते सर्वांसमोर यावे. तरीही शिवसेना-भाजपात मध्यस्थी करण्याऐवढा आता मी मोठा राहिलो नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.
खडसे म्हणाले, महायुतीचे राज्य यावे ही सर्वांची इच्छा आहे. शिवेसना-भाजपामधील ताणतणावं काही दिवसांत मिटेल आणि सत्ता येईल असा मला विश्वास वाटतो. दरम्यान, केवळ मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेनेची नाराजी नाही तर शिवसेनेच म्हणणं आहे जे ठरलं त्याप्रमाणे व्हावं. त्यामुळे ज्यांच्यासमोर जे काही ठरलं आहे ते सर्वांसमोर यावं. राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील हे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषीत केले त्यावर अमित शाह यांनी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे आमच्यासमोरही मुख्यमंत्रीपदासाठी त्यांचेचं नाव आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आदेशानंतर सरकार स्थापनेबाबत निर्णय होईल का? यावर बोलताना खडसे म्हणाले, संघाने भाजपाला राजकारणाबाबत आदेश दिल्याचे मला आठवत नाही. संघाने कायमच सल्लागाराची आणि मार्गदर्शकाची भुमिका बजावली आहे. तरीही शिवसेना-भाजपात मध्यस्थी करण्याऐवढा आता मी मोठा राहिलो नाही, अशी खदखदही खडसे बोलून दाखवली.